…तर सहकार चळवळ पुढे चालू राहील

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; कामोठ्यात अरिहंत बँकेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर सहकार चळवळ पुढे चालू राहील, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे अरिहंत बँकेच्या उद्घानावेळी केले. खातेदारांचा विश्वासावर सार्थ ठरलेल्या श्री अरिहंत को-ऑरेटीव्ह बँकेची शाखा कामोठे येथे सुरू झाली आहे. अरिहंत बँकेची ही 11 वी शाखा असून, या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 7) उद्घाटन झाले.

या वेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या तामखडे, भुमीराज गु्रपचे भुपेंद्र शहा, भीमेष मेहता, राजन सींग, विश्वनाथ झिंजाद, रोहित कुमार, मोहन निकम, दिनेश पटेल, मुकेश वर्मा, सुनील पाटील, भरत उटेकर, बँकेचे चेअरमन हिराचंद दांड, व्हाईस चेअरमन मुकेश मायशेरी, गुलाब शहा, सीइओ अशोक सावालकर, ब्रांच मॅनेजर संदीप खारमाले आदी उपस्थित होते.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply