तलवारबाजी स्पर्धेत ‘आरटीपीएस’ला पदके

खारघर : रामप्रहर वृत्त

नंदूरबार फेन्सिग असोसिएशनतर्फे पाथ्री येथील के. डी. गावित एज्युकेशनल कॅम्पसमध्ये आयोजित कॅडेट महाराष्ट्र राज्य तलवारबाजी चॅम्पियनशीपमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.

‘आरटीपीएस’च्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आपली चमकदार कामगिरी स्पर्धेत दाखविली. यामध्ये सांघिक प्रकारात आदिती रॉय (इयत्ता दहावी) आणि अंजली गुणाई (दहावी) यांनी रौप्यपदक व सलोनी कुमावत (आठवी) हिने कांस्यपदक पटकाविले, तर वैयक्तिक प्रकारात राज जाधव आणि ओम जंगम (दोघेही इयत्ता दहावी) यांनी सहभाग नोंदविला.

संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या स्वप्नील मोरे यांचे अभिनंदन केले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply