Breaking News

तलवारीने वार करणारे त्रिकुट गजाआड

पनवेल : वार्ताहर

पाळीव डुक्कर चोरण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला हटकरणार्‍या पितापुत्रावर तिघा चोरट्यांनी तलवारीने वार केल्याची घटना रबाळे एमआयडीसीमध्ये घडली. राजेंद्रसिंह शिखलकरी (वय 60), जगदीश शिखलकरी (वय 40) व त्याचा 16 वर्षीय मुलगा अशी या त्रिकुटांची नावे असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. 

या घटनेतील जखमी झालेल्यांमध्ये बाबासाहेब धांडे व तान्हाजी धांडे या दोघांचा समावेश असून ते रबाळे एमआयडीसीमध्ये रहाण्यास आहेत. धांडे यांचा गावठी डुक्कर पाळण्याचा व त्यांची विक्री करण्याचा पारंपारिक व्यवसाय आहे. डुकरांची देखरेख करताना डुक्कर चोरण्यासाठी आलेल्या तिघांना हटकले धांडे यांनी हटकेले. यावरून चोरांनी धांडे व त्यांच्या मुलावर तलवारीने वार केले. धांडे पिता पुत्रांनी पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याजवळ असलेली तलवार व कार जफ्त केली. डुक्कर चोरण्यासाठी आलेले तिघे शिखलकारी हे एकाच कुटुंबातील असून ते वसई भागात रहाण्यास असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळुन आले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply