Breaking News

तळोजा एमआयडीसीतील एक्युप्रिंट कंपनीत कोरोनाचा कहर

पनवेल महापालिकेने लावले सील

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार – तळोजा एमआयडीसीतील एक्युप्रिंट कंपनीत तब्बल 35 ते 40 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिका प्रशासनाकडून ही कंपनी सील करण्यात आली आहे. कंपनी प्रशासनाच्या जबरदस्ती धोरणामुळे व नाईलाजाने कामगार कंपनीत येत होते. याबाबत महापालिकेकडे माहिती मिळताच या कंपनीला कुलूप ठोकण्यात आले.

पनवेल तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून तळोजा एमआयडीसीमधील अनेक कारखान्यांत कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. येथील एक्युप्रिंट कंपनीत तर तब्बल 35 ते 40 कामगारांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी सुद्धा या कंपनीचे कामकाज सुरूच होते. या कंपनीत कामगारांना कंपनीच्या बाहेर काढून कंपनीचे कामकाज बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर महापालिका प्रशासनाला याबाबत कळविल्यानंतर महापालिकेने तातडीने कारवाई करत कंपनी सील केली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून सुद्धा, या कंपनीचे कामकाज सुरूच होते. या कंपनीत कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याचे कामगारांना माहिती मिळाली होती. परंतु कंपनी प्रशासनाकडून जबरदस्तीने कामगारांना कामावर येण्यास सांगितले जात होते. तसेच कामावर न आल्यास काढून टाकण्याची धमकीही दिली जात होती, असे येथील कामगार वर्गाकडून आरोप करण्यात आले आहेत.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply