पनवेल : बातमीदार – तळोजा वसाहतीसमोर रेल्वेलाईनखालून जाणारा मार्ग पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सिडकोने यावर मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.
नवी मुंबईतील तळोजा वसाहतीमधील रेल्वे क्रोसिंग खालून वाहनांची ये-जा करण्यासाठी असलेला भुयारीमार्ग मागील दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची करण्यासाठी गैरसोय होत आहे.
या मार्गामुळे इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला होता. हा भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने सध्या तळोजा वसाहतीमधील वाहनचालक पेणधर येथील दिवा-पनवेल लोहमार्ग ओलांडून ये-जा करीत आहेत. सिडकोने या समस्येकडे लक्ष देऊन ती सोडवावी, अशी मागणी होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper