नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील निराशाजनक कामगिरीमुळे 2018मध्ये पुरुष संघाची जबाबदारी काढून घेत महिला संघाची देणे हा निर्णय अपमानजनक होता, असे मत भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी व्यक्त केले आहे.
नेदरलँड्सचे माजी हॉकीपटू मरिन 2017मध्ये भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरातच त्यांची पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, मात्र 2018मध्ये हरेंद्र सिंग यांना पुरुष संघाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे मरिन यांना पुन्हा महिलांचे प्रशिक्षक करण्यात आले.
मरिन यांच्या मनात तो कटू प्रसंग आजही ताजा आहे. मरिन टोकियो येथून परत आल्यानंतर एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, तेव्हा जे घडले, त्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. त्या निर्णयाबद्दल मी खूश नव्हतो, परंतु जेव्हा मला महिला संघाची जबाबदारी पुन्हा दिली, तेव्हा गोलरक्षक सविता माझ्या खोलीत आली आणि म्हणाली सर, तुम्ही परत आलात, त्याबद्दल आम्ही खरच खूप आनंदित आहोत. तिच्या त्या वक्तव्यामुळे मला ऊर्जा मिळाली.
RamPrahar – The Panvel Daily Paper