मोहोपाडा : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील घोसाळवाडी येथील ज्ञानेश्वर सुर्वे यांचे चिरंजीव यश व साई यांनी मुंबई येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुयश प्राप्त केले आहे.
टायगर तायक्वांदो अॅकॅडमीच्या वतीने आयोजित चॅम्पियनशिपमध्ये यश सुर्वे याने 13 वर्षांखालील 30 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले, तर साई सुर्वे याने पाच वर्षांखालील 15 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. दोन्ही खेळाडू हे प्रशिक्षक सचिन माळी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे अभिनंदन होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper