आमदार महेश बालदी यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
तारा, कर्नाळा अभयारण्य, चिंचवण व पळस्पे सर्व्हिस रोडवर पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अंमलबजावणी युनिट पनवेल प्रकल्प संचालक श्री. घोटकर यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार महेश बालदी यांच्या मागणीचे पत्र कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू पाटील, माजी उपसरपंच विद्याधर जोशी यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले. आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीतील पत्रात म्हटले आहे की, तारा, कर्नाळा अभयारण्य, चिंचवण व पळस्पे या सर्व्हिस रोडवर स्थानिक ग्रामस्थांचा धार्मिक पालखी सोहळा मार्गक्रमण होत असतो तसेच रात्रीच्या वेळी अंधारात वाहनचालकांना वाहतूक करण्यास फार गैरसोय होत असते. अंधारामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. हे सर्व लक्षात घेता या ठिकाणी दोन्ही बाजूंना स्ट्रीट लाईट बसविण्यात यावे व तशी तातडीने कार्यवाही व्हावी.
RamPrahar – The Panvel Daily Paper