
पनवेल ः वार्ताहर
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनमध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणार्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून सात लाख रुपये लाच मागणार्या सिडको अधिकार्याला पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग 2चे क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा (वय 57) यांनी तक्रारदाराकडे विमानतळ पुनर्वसनामध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणार्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी सिडको कार्यालयात आरोपी मुकुंद बंडा यांना पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपये स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, निरीक्षक बेंद्रे, हवालदार पवार, गायकवाड, पोलीस नाईक ताम्हाणेकर, नाईक, शिपाई चौलकर आदींच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper