Breaking News

थेरोंडा समुद्रकिनारी मृत व्हेल मासा

रेवदंडा ः प्रतिनिधी

थेरोंडा समुद्रकिनारी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत वाहून आलेला व्हेल मासा आढळला असून, त्याचे तुकडे समुद्रकिनारी विस्कटले होते. अनेक दिवस समुद्रात मृतावस्थेत राहिल्याने व्हेल मासा कुजला होता. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. व्हेल मासा अंदाजे 30 ते 40 फूट लांबीचा आहे. समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात कुजलेल्या अवस्थेतील या व्हेल माशाचे तीन मोठे तुकडे झाले असून ते इतरत्र पसरले आहेत. दुर्गंधीमुळे मृतावस्थेतील व्हेल माशाला पाहण्यासाठी दूरूनच स्थानिकांनी गर्दी केली होती.  व्हेल माशाला देवमासाही म्हटले जाते. याबाबत संबंधित अधिकारीवर्गाशी संपर्क केला असता समुद्रकिनारी पाण्यात वाहून आलेल्या कुजलेल्या व्हेल माशाला तेथेच मातीत पुरण्यात येणार असल्याचीमाहिती मिळाली.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply