Breaking News

दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी अनिल नवगणे यांची नियुक्ती

म्हसळा : प्रतिनिधी  – शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी माणगाव तालुकाप्रमुख अनिल नवगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अनिल नवगणे यांची दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. म्हसळा तालुक्यातून माजी सभापती महादेव पाटील, शहरप्रमुख अनिकेत पानसरे, माजी उपतालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, शहर संघटक कल्पेश जैन, युवा सेना उपशहर अधिकारी कौस्तुभ करडे यांच्यासह शिवसैनिकांनी नवगणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply