हिंगोली : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 10) माहिती दिली. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलैदरम्यान, तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचे गायकवाड यांनी हिंगोली येथे बोलताना सांगितले.
लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची संपूर्ण प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे निकाल रखडले आहेत. दरम्यान, आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाकडे आता लक्ष लागले आहे
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper