Breaking News

दारूची वाहतूक करणार्यांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर – पनवेल परिसरातून दारूची वाहतूक करणार्‍या वाहनांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 30) पळस्पे नाकाबंदी चेक पोस्ट, पनवेल या ठिकाणी हुंडाई एसेंट कार (क्र.एमएच 03/सीएच 2827) या गाडीतून शागिर छोटू खान(29, रा. लोटस कॉलनी, गोवंडी, मुंबई) शिवा हनुमंता गुडपास (22, रा. सवेरा सोसायटी, कुर्ला (पूर्व), मुंबई) उबेद शकुर शेख (24, रा. वर्षा आदर्शनगर, कुर्ला (पूर्व), मुंबई) हे किंगफिशर बियरच्या 35 बाटल्यासह मिळून आल्याने त्यांचेविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) सह भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत  5775 रुपये किंमतीची बियर व  3 लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींना सीआरपीसी 41 (1) अ प्रमाणे नोटीस देवून सोडले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply