आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य
उरण : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निलेश बामा पाटील यांच्यामार्फत सोमवारी (दि. 18) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच लेझीम व फळवाटप करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी यांची ज्येष्ठ कन्या राधिका बालदी आणि नेहा बालदी तसेच जासई विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे, दिघोडे ग्रामपंचायत सरपंच सोनिया मयूर घरत, वेश्वी ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य अजित पाटील, भाजप दिघोडे गाव अध्यक्ष राजेश पाटील, दिघोडे ग्रामपंचायत सदस्य कविता म्हात्रे, युवा मोर्चा विंधणे पंचायत समिती अध्यक्ष मयुर पाटील, युवा नेते आश्विन पाटील, ज्ञानदीप म्हात्रे आदींसह शिक्षक, विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापन कमिटी उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे आभार मुख्याध्यापक जितेंद्र ठाकूर यांनी मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper