
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्यांवर सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper