Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी उरणमध्येही बैठक

उरण ः वार्ताहर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार व यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली उरण  तालुक्यातील द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई ठाकूर विद्यालयात शनिवारी (दि. 19) बूथ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक-नगरसेविका आदींची बैठक घेण्यात आली. यापुढे रविवारपासून गावनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. या वेळी कोण म्हणतो देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. आमचा निर्धार पक्का आहे. आपण सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करू या, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी 10 जूनला रायगड, ठाणे, मुंबई व पालघर जिल्ह्यांत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास उदंड प्रतिसाद लाभला. आता येत्या 24 जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव घालण्यात येणार असून, या आंदोलनाचीही जोरदार तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनात उरण तालुक्यातून किमान 25 ते 26 हजार लोकांचा सहभाग असणार आहे. या वेळी सर्वांनी 24 जूनचे आंदोलनही यशस्वी करण्याचा निर्धार केला. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष चंद्रकांत घरत, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, महादेव बंडा, भाजप रायगड जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष सुधीर घरत, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हेमंत भोईर, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, उरण शहर भाजप अध्यक्ष कौशिक शाह, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, चाणजे ग्रामपंचायत सदस्य अजय म्हात्रे, उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील, तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, नगरसेवक नंदू लांबे, नगरसेविका जान्हवी पंडित, स्नेहल कासारे,  नगरसेवक राजेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, चंद्रकांत गायकवाड, हितेश शहा, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण तालुका ओबीसी सेल अध्यक्ष हेमंत भोंबळे, रमेश नाखवा, प्रदीप नाखवा, अरविंद पवार, हस्तीमल मेहता, तालुका चिटणीस नरेश म्हात्रे, निलेश ठाकूर, प्रमोद ठाकूर, आशिष तांडेल, दिलीप तांडेल, शेखर तांडेल, अनंता कडू, दिनेश पाटील, फर्ज घरत, जितेंद्र घरत (चिर्ले), तुषार म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, माजी सरपंच वेश्वी अजित पाटील, प्रसाद पाटील, मेघनाथ म्हात्रे, प्रदीप पाटील, निशांत पाटील, मनीष पाटील, निलेश पाटील, मिलिंद तांडेल, मिलिंद पाटील, आशिष तांडेल, राकेश म्हात्रे, अरविंद पवार, अच्युत ठाकूर, सुभाष गोवारी, विजय पाटील, हेमंत पाटील, दीपेश म्हात्रे, मिलन म्हात्रे, विश्वास पाटील, भगवान घरत, अजित पाटील, फरहान पटेल, राजू भोईर, प्रसाद भोईर, निशांत पाटील, हेमंत पाटील, मनोहर जामकर, गौरव कोळी, धीरज कालेकर, सुरज ठवळे, समीर कुथे, देवेंद्र घरत, तेजस पाटील, अशोक मढवी, प्रशांत माळी, रमेश फोफेरकर, मनोहर जोशी, अतुल ठाकूर, सुरज म्हात्रे, प्रसाद पाटील, भगवान घरत आदी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply