नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच या हिंसेप्रकरणी काँग्रेस आणि आपने देशाची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते गप्प आहेत. कारण या हिंसेला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना चिथावणी देण्याचं काम केलं असल्याचा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper