दीड तास पायी चालून आमदार महेश बालदी यांनी घेतली ग्रामस्थांची भेट

खालापूर ः रामप्रहर वृत्त

खालापूर तालुक्यातील चौकपासून साधारण दीड तासाची पायवाट असलेल्या इसाळवाडी येथील ग्रामस्थांची आमदार बालदी यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश बालदी व कार्यकर्त्यांनी दीड तास पायी चालत आपली भेट घेतल्यामुळे तेथील ग्रामस्थांना मोठा सुखद अनुभव आला आणि त्यांनी आमदार महेश बालदी यांच्याप्रति आदर व्यक्त करून त्यांचे आभार मानले. आमदार महेश बालदी हे कार्यतत्पर व संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. जनतेसाठी दीड तास पायी चालून त्यांनी पुन्हा एकदा आपल्यातील सहृदयतेचे दर्शन घडविले आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply