Breaking News

देवकान्हे येथे यंत्राच्या सहाय्याने भातलागवड

रोहा, नागोठणे : प्रतिनिधी

तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत देवकान्हे येथील नथुराम भोईर यांच्या शेतात यंत्राच्या सहाय्याने भातलागवड करण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी सारिका दिघे-सावंत यांनी या प्रात्यक्षिकाचे नियोजन केले.

रोहा तालुका कृषी अधिकारी डी. बी. साले, सहाय्यक कृषी अधिकारी पी. एस. राक्षीकर, विद्या चव्हाण, कविता दोरुगडे, तसेच अविनाश कान्हेकर, पांडुरंग गोसावी, धोंडू कचरे, विश्वनाथ भोईर, सुनील बाईत, प्रसाद भोईर आदी शेतकर्‍यांसह दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply