नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. आरबीआयच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची तीन दिवसीय बैठक गुरुवारी (दि. 6) संपली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दास यांनी विविध निर्णयांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2020च्या पहिल्या सहामाहित जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली आहे. आयातीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे तसेच जगभरातील उत्पादन आणि सेवा क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. येत्या काळात कोरोनाची लस आल्यास चित्र बदलेल, असे मत शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, देशात सध्या महागाई दर नियंत्रणात आहे. एकीकडे दुसर्या देशांच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट होत आहे, परंतु आपल्या परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होत आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper