Breaking News

‘देशात लॉकडाऊनचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशात महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली. देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही, असे शाह यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. निवडणूक प्रचार आणि कोरोनाचा उद्रेक यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी सांगितले की, बघा महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? तिथे 60 हजार रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये चार हजार आहेत. महाराष्ट्रालाही माझी सहानुभूती आहे आणि बंगाललाही. कोरोना रुग्णवाढीला निवडणुकीसोबत जोडणे योग्य नाही. ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यापेक्षा जास्त जिथे निवडणुका नाही झाल्यात तिथे जास्त रुग्ण वाढले आहेत. यावर तुम्ही काय म्हणाल? विविध राज्यातील लसीकरण तुटवड्यावरही शाह यांनी भाष्य केले. आपल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग जगात सर्वाधिक आहे. पहिल्या दहा दिवसांत भारतात उच्चांकी लोकांचे लसीकरण केले गेले. पहिला डोस घेतल्यानंतर दुसर्‍या डोसमध्ये काही अंतर असले पाहिजे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा कार्यक्रमाला वेगवान केले जाऊ शकत नाही. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वृत्ताशी मी सहमत नाही, असेही शाह यांनी स्पष्ट केले. कोरोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्याने लढा देणे थोडे कठीण आहे, पण मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू, असे शाह म्हणाले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply