Breaking News

द्रुतगती महामार्गावरील अपघातात पाच जखमी

खालापुर : प्रतिनिधी  : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका  परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने महेंद्र एक्सयुव्ही कार (एमएच-14,इवाय-9489) महामार्गालगत लावलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील असीम कादीर शेख (वय 30), जुनैद अन्सारी (वय 35), मुस्ताफा शेख (वय 30), शाब्राज  शेख (वय 35) आणि झहीर शेख (वय 30) जखमी झाले. त्यापैकी  गंभीर जखमी झालेल्या असीम कादीर शेख आणि जुनैद अन्सारी यांनी पुढीलसाठी पनवेल येथील खाजगी व कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply