Breaking News

द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात

ट्रकचालक जागीच ठार, सात जण जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 8) सकाळी चार वाहनांचा अपघात झाला. त्यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य वाहनांतील सात प्रवासी जखमी झाले.  ट्रकमधील दोघाजणांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे.  द्रुतगती मार्गावरून पुणे येथून तळोजाकडे जाणार्‍या ट्रक (एमएच-44,यु-0119) चे आडोशी गावाच्या हद्दीत सोमवारी सकाळी ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालक सुरेश सखाराम खाडे (वय 50, रा. खाडेवाडी, जि. बीड) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी सोबत असलेला दुसरा चालक अनिल केकाण व क्लीनर अशोक चौरे (दोन्ही रा. बीड) यांनी प्रसंगावधान राखत अपघात ट्रकमधून उडी मारली. त्याचवेळी अनियंत्रित ट्रकने लेनवरून चालणार्‍या फोर्ड कार (एमएच-12-एसक्यू-1588), कंटेनर टेलर (एमएच-46-एएफ-8828) यांना ठोकर दिली.  कंटेनर ट्रेलरने पुढे शिवशाही (एमएच-6-बीडब्ल्यू-4311) बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रकच्या  केबीनचा चक्काचूर झाला. ट्रक चालक सुरेश सखाराम खाडे याच्या छातीवर स्टीरींग लागल्याने तो जागीच मृत्यू पावला. फोर्ड कारमधील चालक, शिवशाही बसमधील तीन प्रवासी व कंटेनर चालक तसेच ट्रकमधून उडी मारलेले दोन इसम असे एकूण सात जणांना किरकोळ दुखापती झाल्या. अपघाताची माहिती मिळतात बोरघाट पोलीस मदत केंद्र पथक, आयआरबीचे देवदूत पथक, अपघातग्रस्त मदत पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर जखमींना घरी सोडण्यात आले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply