Breaking News

द्रोणागिरी महोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली भेट

उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित द्रोणागिरी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष होते. तब्बल दहा दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगले.
या महोत्सवाला बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले.
या वेळी उपस्थितांना संबोधित करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, आगरी-कोळी महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो. जात-पात विसरून आपण सर्व भारतीय आहोत या भावनेतून एकत्र येणे आज काळाची गरज आहे. समाज आणि गावाच्या हितासाठी आपण एकदिलाने काम केले पाहिजे. आपल्या गावाचा आणि समाजाचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा.
आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सल्लागार यांचे आभार मानत हा महोत्सव दरवर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर आणि कार्यक्रमस्थळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये महोत्सवाचे सल्लागार चंद्रकांत घरत, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, कामगार नेते सुरेश पाटील, उद्योगपती जानूशेठ म्हात्रे , मयूर म्हात्रे, पप्पू सूर्यकांत, स्वराज ठाकूर, गणेश घरत, प्रदीप म्हात्रे, परेश घरत, सागर घरत, निकेश म्हात्रे, पियुष घरत यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, करमणूकपर कार्यक्रम, स्थानिक कलाकारांचे सादरीकरण आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण द्रोणागिरी परिसरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply