पनवेल : रामप्रहर वृत्त
द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या पनवेलमधील सेंटरचे महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) उद्घाटन झाले. हे सेंटर पनवेलमध्ये सुरू करण्यासाठी माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक शैक्षणिक व मानवहितकारी चळवळ आहे, जी तणावमुक्ती आणि सेवा उपक्रमांमध्ये अविरत कार्यरत आहे. ही संस्था जागतिक स्तरावर कार्यरत असून लोकांच्या आयुष्यात बदल घटवण्याचे मोठे काम या संस्थेमार्फत सुरू आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चळवळीने सर्व सामाजिक स्तरांमध्ये सेवा कार्याच्या माध्यमातून शांतता पसरवली आहे. या संस्थेचे पनवेलमधील सिद्धांत मार्केटमध्ये सेंटर सुरू झाले आहे. या वेळी स्वप्नील मोहन कल्याणकर, वेंकटेश रामकृष्ण, श्रीमती सुनीता जी, हनुमंत शिंदे, माधुरी गोसावी आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper