पनवेल ः बातमीदार
एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभर पुकारलेल्या ‘ढोल बजाओ सरकार जगाओ’ या आंदोलनाला पनवेल तालुक्यात प्रतिसाद मिळाला. धनगर समाजाच्या नागरिकांनी कळंबोलीमधील मायाक्का मंदिरात ढोल वाजवून राज्य सरकारविरोधात निदर्शने केली.
राज्यातील धनगर समाजाकडून मागील काही वर्षांपासून एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. समाजाच्या वतीने या मागणीकरिता राज्यभरात अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत, मात्र तरीही धनगर समाजाला आरक्षण लागू करण्यात आलेले नसल्याने ढोल बजाओ सरकार जगाओ अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती या आंदोलनात सहभागी अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सतीश धायगुडे यांनी या वेळी दिली.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper