मुरूड : प्रतिनिधी
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 277 श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील अनेक गावांत 510 झाडांची लागवड केली आहे.
पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील बारशीव, काशीद, चिकणी, माजगाव, मोरे, मुरूड शहर, डोंगरी, आगरदांडा, टोकेखार, वावे, वांदरे, अंदाड या गावात कोकम, फणस, चिंच, जांभूळ, सीताफळ, उंबर, रामफळ, चिकू, आंबा, पळस, करंज, बेल अशा विविध झाडांच्या रोपांची लागवड केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper