पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14, धाकटा खांदा येथे अमृत (2.0) योजनेंतर्गत ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 25) करण्यात आला. माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून हे काम होत आहे.
आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात विकासाची अनेक कामे मार्गी लागत असून नागरिकांना सुविधा प्राप्त होत आहेत. याच अनुषंगाने धाकटा खांदा स्मशानभूमीजवळ महापालिकेच्या माध्यमातून सुमारे 1.50 कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
भूमिपूजन समारंभास माजी नगरसेविका सारिका भगत, जैनब शेख, हेमलता म्हात्रे, माजी नगरसेवक महेंद्र कावळे, मुकीत काझी, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, उज्वला पाटील, सतीश पाटील, परेश पाटील, बाळकृष्ण म्हात्रे, भरत म्हात्रे, किशोर म्हात्रे, विनोद भगत, अतुल भगत, रोहित आठवणे, तुषार कापरे, गोवर्धन म्हात्रे, सुजित म्हात्रे, राकेश म्हात्रे, विकी तांबडे, नितेश म्हात्रे, मयूर म्हात्रे, विनायक म्हात्रे, हरेश म्हात्रे, रामभाऊ म्हात्रे, भास्कर भगत, मनोज पाटील, विशाल तांबडे, पंकज डोंगरे, रवींद्र डोंगरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper