रोहे : प्रतिनिधी

धाटाव केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव 2019 राजिप शाळा लांढर येथे दि. 28 फेब्रु. व दि. 01 मार्च सकाळी 7 ते सायं 6 या दरम्यान घेण्यात आला. धाटाव, वाशी, तळाघर, निवी, महादेवाडी, वरसे, विष्णू नगर, किल्ला, रोठ खुर्द, रोठ बुद्रुक, बोरघर या शाळांनी सहभाग घेत 1 मार्च रोजी केंद्र धाटाव यांचे बाल संस्कार शिबिर रायगड जिल्हा परिषद शाळा लांढर येथे घेण्यात आले. या बालसंस्कार शिबिरात सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी जन्मू काश्मीर येथील पुलावमा येथील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. घटक केंद्राचे केंद्रप्रमुख नारायण गायकर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
या वेळी रोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बांगारे, बीट विस्तार अधिकारी विनोद पाटील, केंद्रप्रमुख गायकर, रोहा पं. स. सभापती अनिल भगत, यशवंत भगत, सरपंच सतीश भगत, तुकाराम भगत, रितेश भगत, राम महाडिक, दीपक भगत, रुचिरा वाघमारे, लक्ष्मण जंगम, स्नेहल भगत, कविता शिंदे, प्रियंका टेंबे यांच्यासह पदवीधर शिक्षक सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी पालक गावातील तरुण वर्ग व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाशी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोठेकर यांनी केले.विजयी स्पर्धकांना परितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रामचंद्र भोईर, सुरेश राठोड, प्रकाश पाटील, सुरेश आव्हाड, उमाजी जाधव, राजेश्री जगताप, शर्मिला कोठेकर, वृषाली भोईर, अंजना बिरांजे, माधवी जाधव, निवेदिता नाईक, अरुणा लाड, मनस्विनी होनाळे, शरयू खैर, दीपक पाटील, मिलिंद कासोर या सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले. शेवटी धाटाव केंद्रप्रमुख गायकर यांनी सर्वांचे आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper