जयपूर : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत होता. काही दिवसांपूर्वी तो लष्करी सेवा पूर्ण करून घरी परतला. त्यानंतर आता त्याचा एक वेगळा फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
धोनी लष्करी सेवेतून परतल्यानंतर सध्या तो काही जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगसाठी प्रवास करताना त्याचा एक नवा लूक दिसून येत आहे. यात तो कमांडो लूकमध्ये दिसत आहे. त्याने कमांडो बांधतात तसा काळ्या रंगाचा रूमाल (बंदाना) डोक्याला बांधला आहे.
राजस्थानमधील जयपूरमध्ये तो एका कामासाठी गेला असताना त्याचा हा नवा लूक चाहत्यांच्या नजरेस पडला आणि चाहत्यांना हा लूक प्रचंड आवडला.
RamPrahar – The Panvel Daily Paper