रांची ः वृत्तसंस्था
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार्या महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंह धोनीचे वडील पानसिंह आणि आई देविकादेवी यांच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धोनीच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आलेल्या पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दोघांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य असून त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. उपचारांनंतर पुढील काही दिवसांमध्ये धोनीचे आई-वडील ठणठणीत बरे होतील, अशा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper