बेंगळुरू : वृत्तसंस्था
चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध एका धावेने पराभव पत्करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत कर्णधार महेंद्रसिंह धोनीची झुंज अपयशी ठरली. धोनीने या लढतीत 48 चेंडूंत 7 षटकार व 5 चौकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली, मात्र धोनीने 19व्या षटकात तीन चेंडूंवर धाव घेण्यास नकार दर्शविला होता. त्यामुळे त्याच्या ‘गेम प्लॅन’बद्दल अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत, मात्र प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीवर विश्वास दर्शविला आहे. अखेरच्या षटकापर्यंत लढत नेण्याच्या योजनेबाबत धोनीला कधीच प्रश्न विचारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका फ्लेमिंगने मांडली आहे.
फ्लेमिंग म्हणाले, ‘धोनीचे अखेरच्या षटकातील गणित पक्के असते. त्यामुळे त्याच्या बाबतीत शंका घेण्याचे काम नाही. अर्थात ब्राव्होतही आक्रमक फटकेबाजीची क्षमता आहे, पण धोनीला लढत जिंकून देण्याचा विश्वास होता. त्यामुळे त्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे. त्याने यापूर्वी अनेक लढती अशाच प्रकारे जिंकून दिल्या आहेत.’
RamPrahar – The Panvel Daily Paper