नगरसेवक राजू सोनी यांनी केली स्वखर्चाने चेंबरची दुरुस्ती

पनवेल : वार्ताहर  : पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी रोहिदासवाडा व परिसरातील दुर्दशा झालेल्या गटारे व चेंबरची दुरुस्ती स्वखर्चाने करून दिली.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील गटारे व चेंबरची अवस्था खराब होती. या संदर्भातील अनेक तक्रारी स्थानिक रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेतील संबंधित खात्याकडे केल्या होत्या, परंतु याची दखल न घेतल्याने, तसेच सदर गटार व चेंबरची अवस्था अजून बिकट होत चालल्याने याबाबतची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना देण्यात आली. तातडीने राजू सोनी यांनी त्या जागेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व स्वखर्चाने कामगार लावून तेथील दुरुस्ती करून घेतली. या नागरी प्रश्नाला त्वरित प्रतिसाद देऊन काम केल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी राजू सोनी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply