Breaking News

नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला.

अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, सेक्रेटरी प्रकाश पावसकर, खजिनदार सुनील पेडणेकर, आरसीएफचे क्रीडाधिकारी पांडुरंग सोनार, शैलेश घरत आदी या वेळी उपस्थित होते. स्पर्धेसाठी क्रीडांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रदीप नाईक यांनी आरसीएफचे आभार मानले.आर. सी. एफ. क्रीडासंकुल करूळ येथील मैदानात ही स्पर्धा खेळली जात आहे. अलिबाग तालुक्यातील 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 26 मे रोजी अंतिम सामना होईल. त्याच वेळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रसाद मगर, ॠषिकेश पिंगळसकर, सागर काटकर, पज्ञेश पावसकर, अनिश मिठागरी परिश्रम घेत आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply