Breaking News

नगराध्यक्ष चषक जलतरण स्पर्धेस उरणमध्ये उदंड प्रतिसाद

उरण : वार्ताहर

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण नगर परिषद व हौशी जलतरण संघटना उरण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नगराध्यक्ष चषक 2019 जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा अलोक अक्वा इंजिनिअर्स जलतरण तलावात घेण्यात आली. या स्पर्धेत 155 स्पर्धकांनी विविध आठ गटांत सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, उरण शहर व नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक राजू ठाकूर, मेराज शेख, नंदू लांबे, तुषार ठाकूर, नगरसेविका रजनी कोळी, प्रियंका पाटील, आशा शेलार, जान्हवी पंडित, दमयंती म्हात्रे, यास्मिन गॅस, महेश बालदी मित्र मंडळ सदस्य, स्पर्धेचे व्यवस्थापक नगरसेवक धनंजय कडवे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष निलेश पाटील, माजी नगरसेवक राजेश् कोळी, मदन कोळी, मनोहर सहातिया, जलतरण संघटनेचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी सुनील पाटील यादी उपस्थित होते.

पंच म्हणून दिनेश भोईर, अनिल कटधरे, हिमांगु मलबारी, सचिन शिगृत, संदेश पाटील आदींनी काम पाहिले. श्रीकांत जाधव, वीरेश मोडखरकर, प्रज्ञा मोडखरकर, ओमकार कोळी, प्रथमेश कडवे, प्रियांशु पाटील यांचेही सहकार्य लाभले.

स्पर्धेत दळवी (रोहा), सूचित पाटील (पनवेल), नील वैद्य (पेण) यांना विविध गटांत नगराध्यक्ष चषक देऊन गौरविण्यात आले. मुलींच्या गटात किर्ती हंबीर (उरण), दिया शर्मा (खारघर) यांनाही गौरविण्यात आले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply