
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यदिनी रविवारी (दि. 16) पोलादपूर तालुक्यात सिंहगड ते उमरठ नरवीर पालखी यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. रविवारी सकाळी हभप सखाराम कळंबे यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या वेळी हभप गणपत आनंदा कळंबे यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. दरम्यान, उत्सव समिती ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते प्रतापगड येथील शिकालीन खेडे या संकल्पनेचे प्रज्ञार्तक, तर आप्पासाहेब उतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी पोलादपूर तालुक्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच वारकरी सांप्रदाय आणि स्वयंसेवी संघटनांचा मिरवणुकीत सहभाग होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper