Breaking News

नवीन पनवेलमधील पाण्याची समस्या सोडवा; नगरसेविका अॅंड. वृषाली वाघमारे यांची सिडकोकडे मागणी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील सेक्टर 13, प्रभाग क्रमांक 17मध्ये नागरिकांना कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्यासंदर्भात नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी सिडको अभियंता राहुल सरोदे यांना येथे पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले, तसेच येथील पाण्यासंदर्भात समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. त्यावर आजपासून येथील कामाला सुरुवात करणार, असे सरोदे यांनी सांगितले. या वेळी भाजप कार्यकर्ते अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, संजय म्हात्रे, सौ. म्हात्रे, हभप शेळके महाराज, सौ. पिसाळ, विभूती कोळी आदी नागरिक, रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply