Breaking News

नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये ड्रोनद्वारे होणार सॅनिटायझर फवारणी

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिकेने कोरोनाला आळा घालण्यासाठी कंबर कासल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार पालिका येत्या काळात शहरात ड्रोनद्वारे सॅनिटायजर  फवारणी करण्याच्या विचारात आहे. सुरुवातील दाटीवाटीने वसलेल्या विभागात कंटेन्मेंट झोनमध्ये ही फवारणी करण्यात येणार असून त्यानंतर उर्वरित भागात करण्यात येणार आहे.  शनिवारी (दि.11) पालिकेने मुख्यालयाच्या आवारात ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक देखील घेतले असून लवकरच शहरात ड्रोन उडताना दिसणार आहेत.

शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सरसावली आहे. याधी स्वाध्याय परिवाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागास देण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा पाच अत्याधुनिक बूम स्प्रेयर पैकी एक वाहन नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले असून त्याद्वारे शहरात फवारणी सुरू आहे. मात्र अनेक दाटीवाटीने वसलेल्या भागांमध्ये हे वाहन नेता येत नसल्याने व मनुष्यबळाची कमतरता असल्याने ड्रोनद्वारे सॅनिटायजर फवारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कामाला वेगही येणार असून कर्मचार्‍यांची सुरक्षाही होणार आहे. याआधी लॉकडाऊन काळात रमजानला सुरुवात होताना नवी मुंबईसह राज्यभरात नागरिकांनी इमारतींच्या गच्चीवर जमून नमाज पढणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला होता. नवी मुंबईत गावठाण तसेच झोपडपट्टी भाग दाटीवाटीने वसलेला आहे. त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांना व थेट रुग्ण आढळलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचणे अहकाय नसून निर्जंतुकीकरण फवारणीत अडथळे येऊ लागले आहेत. ही बाब ध्यानात घेत पालिका ड्रोनद्वारे अशा दाटीवाटीच्या ठिकाणी फवारणी करणार असून फवारणी करताना त्यापासून नागरिकांना काही धोका होणार नाही ना याची देखील खात्री केली जाणार आहे. त्यानुसार पालिकेने मुख्यालयात ड्रोनमधून फवारणी करण्याबाबत चाचपणी केली असून लवकरच शहरात ड्रोन फिरताना दिसणार आहेत.

ड्रोनद्वारे शहरात सॅनिटायजिंग फवारणी करण्याबाबतची चाचपणी घेण्यात आली आहे. सुरुवातीला शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट परिसर, कंटेन्मेंट झोन व त्यांनंतर उर्वरित शहरात ही ड्रोनद्वारे फवारणी केली जाईल.

-संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply