नवी मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे शहरात मनपाकडून विविध ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. त्यानुसार वाशीतील एमजीएम रुग्णालय व इएसआयएस या दोन रुग्णालयात जम्बो लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी भाजपचे अॅड. निलेश भोजणे व सामाजिक कार्यकर्ते अंशुवर्धन राजेश शेट्टी यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली होती. त्यानुसार मनपा आयुक्तांनी भोजणे यांच्या मागणीची दखल घेत त्या ठिकाणी जम्बो लसीकरण केंद्र सुरू केले आहेत.शहरात असणार्या कोरोना लसीकरण केंद्रातील गर्दी पाहता आयुक्तांनी आणखी काही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावीत. या मागणी करिता भोजणे यांनी मनपा आयुक्तांना भेटून त्यांच्याकडे लेखी मागणी केली होती. त्यावेळी आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार मनपाकडून दोन्ही रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून ईएसआयएस रुग्णालयात लसीकरण पूर्णपणे विनामूल्य आहे. 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षांवरील सर्व लोक लस घेण्यास सक्षम असतील त्यांनी मोफत लसीकरण करून घेण्याचे आवाहन भोजणे यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper