अमृता फडणवीसांची उपस्थिती; खारफुटीच्या संवर्धनासाठी पुढाकार
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
खारफुटीच्या संवर्धन आणि संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मँग्रोव्हज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीतील महिलांसाठी मँग्रोव्हेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी याठिकाणी अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती.
मँग्रोव्हेथॉनमध्ये 3 किमी 5 किमी आणि 10 किमी गटात मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक शाळांमधील विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता. खारफुटीच्या संवर्धनाच्या दिशेनं इनरव्हील क्लब आणि मँग्रोव्हज फाऊंडेशन स्तूत्य उपक्रम हाती घेतलाय.
पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था पुढे येतात. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमही राबवले जातात. खारफुटी वाचवण्यासाठी ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मँग्रोव्हज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीतील महिलांसाठी मँग्रोव्हेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी याठिकाणी अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. मँग्रोव्हेथॉनमध्ये 3 किमी 5 किमी आणि 10 किमी गटात मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक शाळामधील विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी खारफुटीच्या संवर्धनासाठी आणखी लोकांनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आले. तर यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण खारफुटीचे संवर्धन करू शकतो, असेही मान्यवरांनी बोलून दाखवले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी त्यांनी या सारख्या उपक्रमांची सध्या अधिक गरज असल्याचेही बोलून दाखवले. फ्लेमिंगो सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईतील समुद्राच्या तळावर पसरलेल्या खारफुटीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, असेही अमृता फडणवीस या वेळी म्हणाल्या.
सध्या ग्लोबल वार्मिंगची चिंता वाढते आहे. वाढत्या ग्लोबल वार्मिंगची डोकेदुखी दिवसागणिक वाढत चालली आहे. यावर देशासह जागतिक स्तरावर विचारमंथन वेळोवेळी केले जाते, मात्र ग्लोबल वार्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. रोज वाढणारी सिमेंटची जंगल पाहता निसर्ग संवर्धनाचे सोडाच आपण सिमेंटचे जंगल दिवसागणिक वाढवत असल्याचे दिसतेय. यातच ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मँग्रोव्हज फाऊंडेशनने खारफुटीच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकलेय.
RamPrahar – The Panvel Daily Paper