Breaking News

नवी मुंबईत 88 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 8) कोरोनाचे 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 92  झाली आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 974 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 758 झाली आहे. त्यामुळे बरे होणार्‍या व्यक्तींचे प्रमाण एक टक्क्याने घसरन होऊन ही 59  टक्क्यांवर पोहोचले आहे.  सद्य स्थितीत एक हजार 124 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 10, नेरुळ 17, वाशी 15, तुर्भे 13, कोपरखैरणे 11, घणसोली 11, ऐरोली 10, दिघा 1 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी आढलेल्या 88 जणांत  वयोमान पाहता नेरुळ गावात कमी वयाच्या दोन वर्षांच्या मुलीला व 85 वर्षांच्या आजीला कोरोनाची लागण झाली आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply