पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर मुलाखतीची पहिली फेरी शनिवारी (दि. 26) नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या भरती प्रक्रियेदरम्यान पाहणीवेळी विमानतळबाधित आणि स्थानिक भूमिपुत्रांना यामध्ये प्राधान्य द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडली.
ओसीएस या कंपनीमार्फत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे. उरण-पनवेल तालुक्यात यापूर्वीही जेएनपीटी, ओएनजीसी, माझगाव डॉक यांसारखे विविध मोठ मोठे प्रकल्प आले आहेत. यामध्ये आमच्या येथील स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांना त्यांनी सामावून घेतले आहे. अगदी नवीन असलेल्या व कोणताही अनुभव नसलेल्या स्थानिक भूमिपुत्रांनी या कंपन्यांमध्ये चांगले काम करून दाखवले आहे. त्यामुळे अनुभव नसला तरी चालेल, आपण त्याला प्रशिक्षण देऊन या विमानतळात सामावून घ्यावे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले.
या वेळी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजप पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सचिव प्रेम पाटील, गजानन पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper