नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु या परिस्थितीतही जागतिक बँकेने भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा वेग जास्त असेल, असा अंदाज वर्तवला आहे.
जागतिक बँकेने दक्षिण आशिया वॅक्सिनेट्स अहवालात याबद्दलची माहिती दिली आहे. यामध्ये जागतिक बँकेने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2021-22मध्ये भारताचा जीडीपी 7.5 ते 12.5 टक्के वेगाने वाढेल, पण हा विकासदर पूर्णपणे कोरोना लसीकरणावर अवलंबून असेल.
सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अर्थात जीडीपी हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे एक मापक आहे. एखाद्या देशाचा जीडीपी म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत असते. त्या दृष्टीने भारताला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
अन्य एजन्सी, संस्थांनी वर्तवलेला अंदाज
फिच : 12.8 टक्के
मूडीज : 12 टक्के
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ः 11.5 टक्के
केयर रेटिंग्स ः 11-11.2 टक्के
एस अॅण्ड पी ः 11 टक्के
आरबीआय ः 10.5 टक्के
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper