पनवेल : रामप्रहर वृत्त
महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत आणि माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी नागरिकांना नववर्षाची भेट म्हणून 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1 जानेवारी) प्रकाशन झाले.
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशीला घरत आणि माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी अस्मिता कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ, प्रियदर्शनी कला, क्रीडा मंडळ व ओम साई कलावंत मित्रमंडळाचे 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात राबवलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्या तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, संजय भंडारी, हनुमान मिसाळ, अमित पाटील, संदीप पाटील, प्रमुख पवार, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, सीमा नरे, रंजना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper