खोपोली : प्रतिनिधी
भारतीय संविधानातील सर्व संसदीय कार्यप्रणालीचा अवलंब करून बहुमताने नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेत व राज्यसभेत मंजूर झाला. या कायद्याच्या जनजागृती व समर्थनार्थ जागरूक नागरिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 12) सकाळी 10 ते 12. 30 या दरम्यान खोपोलीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरूवात शहरातील फायर ब्रिगेड कार्यालयापासून होणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रॅलीची सांगता होणार आहे. देशपे्रमी नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जागरूक नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper