पनवेल ः रामप्रहर वृत्त
पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून नवीन पनवेलमध्ये उभारण्यात आलेल्या समाजिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा विकासनिधी आणि महापालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 16, प्लॉट नंबर 3 येथील गार्डनमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे. माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून 19 लाख 11 हजार रुपये खर्चाचे हे काम पूर्ण झाले आहे. या सभागृहाचे उद्घाटन शनिवारी (दि. 7) माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, अजय बहिरा, सुनील बहिरा, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, अॅड. वृषाली वाघमारे, प्रिती जॉर्ज, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, अर्चित घरत, चंद्रकांत म्हात्रे, मनोज म्हात्रे, रघुनाथ बहिरा, सुजाता पाटील, सरोज मोरे, प्रभा सिन्हा, सोनाली कुदळे, सरिता पाटील, शिवानी रावते, मितेश ठाकूर, किशोर मोरे, कमलाकर घरत, विवेक पाटील, डॉ. शुभदा नील उपस्थित होते.
या वेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या सभागृहाचे काम चांगल्या दर्जाचे झाले असल्याचे गौरवोद्गार काढून चारुशीला घरत यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper