Breaking News

नाते तुमचे आमचे

सेलिब्रेटींशी पनवेलकरांनी साधला संवाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री रामशेठ ठाकूर समाजिक विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून आयोजित सकाळ प्रिमीयर नाते तुमचे आमचे हा कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 25) झाला. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात भारुडरंग, महिलांसाठी खेळ पैठणीचा व सिनेकलाकारां सोबत दिलखुलास गप्पांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी उपमहापौर चारुशिला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, हेमलता म्हात्रे, तालुका सरचिटणीस लीना पाटील, प्रतिभा भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सुलोचना कल्याणकर, नीता माळी यांच्यासह पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध कलाकार अनंत जोग, सुमित भुसावळ, काजल मोरे, प्रणाली म्हात्रे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांसोबात दिलखुलास गप्पा मारल्या. भारुडरत्न निरंजन भाकरे यांच्या भारुडरंग या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घेतला. तसेच महिलांनी पैठणीच्या खेळात सहभाग घेतला होता.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply