नवी मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पावलांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच राज्यातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपने सुरू करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मंगळवारी नवी मुंबईत आगमन झाले. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ, पामबीच मार्गावर आगमन झालेल्या या जनआशीर्वाद यात्रेचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जंगी स्वागत करण्यात आले.
भाजप जन आशीर्वाद यात्रेचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या वेळी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी मंत्री गणेश नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सागर नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.
या जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत पारंपारिक कोळीगीत, वाद्य व नृत्याने करण्यात आले तसेच भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त उत्साह व असंख्य जनसमुदाय फेटे बांधून स्वागताकरिता उपस्थित असल्याने या जन आशीर्वाद यात्रेला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण नवी मुंबईमध्ये सीबीडी-बेलापूर, सीवूड्स गायमुख चौक, पूनम टॉवर- नेरूळ, नेरूळ एल.पी.जंक्शन, तुर्भे, माथाडी भवन, वाशी शिवाजी चौक मार्गे दिघ्यापर्यंत या जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी भाजप महामंत्री विजय घाटे, डॉ. राजेश पाटील, सतीश निकम, निलेश म्हात्रे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, महिला अध्यक्ष दुर्गा ढोक, नगरसेवक दशरथ भगत, विनोद म्हात्रे, डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील, स्वाती गुरखे, माधुरी सुतार, सुरज पाटील, गणेश म्हात्रे, राजेश्री कातकरी, सरस्वती पाटील, दर्शन भारद्वाज, जयवंत तांडेल, अशोक चटर्जी, राजू तिकोने, श्रीमंत जगताप, विकास सोरटे, ज्योती पाटील, प्रियांका म्हात्रे, चैताली ठाकूर तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper