Breaking News

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर

शहरातील खामकर हाऊस, भुसार मोहल्ला परिसरात नियमांचे उल्लंघन करून उभ्या असलेल्या आठ जणांवर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन  कारवाई करण्यात आली.

भुसार मोहल्ला खामकर हाऊस परिसरात काही व्यक्ती नियमाचे उल्लंघन करून विनाकारण एकत्रित जमल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नेवसे व त्यांचे पथक या ठिकाणी गेले असता उभे असलेले व्यक्ती पळून गेले. या वेळी सीसीटीव्ही फुटेज वरुन आठ व्यक्तींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply