खोपोली : प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतच होळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह इतर सण असल्याने हे सण परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरे करा, असे आवाहन शांतता कमिटीच्या बैठकीत खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांनी केले.
आचारसंहितेच्या दरम्यान होळी-धूलिवंदन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह मोहरम, रामनवमी, महावीर जयंती हे सणउत्सव असून, या पार्श्वभूमीवर खोपोली पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, उल्हासराव देशमुख, नगरसेवक मोहन औसरमल, मनेष यादव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पुरी, राजेंद्र फक्के, मोईन खान, दिलीप पोरवाल, दिलीप देशमुख, चंद्रकांत केदारी, रिचर्ड जॉन यांच्यासह रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.यादरम्यान उपस्थितांना आपापल्या समस्या मांडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, खोपोली शहर हे शांतताप्रिय शहर असून, निवडणुकीच्या काळात आपले सण उत्सव आनंदाने साजरे करू. या दरम्यान गाळबोट लागणार नाही याची खबरदारी घेत आपणाला कोणतीही आडचण आल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे अवाहन केले, तर आचरसंहिता असताना सोशल मीडियावर सर्राच राजकीय पक्षाचे थट्टा उडविणारे मेसज बाबत मा. नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी विचारणा केली असता यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया असून, यावर चर्चा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी यांनी आयोजित केली असून त्यानंतर आपल्या खोपोली शहर व तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांची बैठक आयोजित करू, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. या बैठकीत प्रस्तावना व आभार खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक के. एस. हेगाजे यांनी मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper